एक केव्हाही करता येते
मागच्या मागे पळता येते
कोण काहीही बोलू शकतो
तोंड कोणाचे धरता येते ?
ठेविली कुरणे त्यांनी मोठी
भेटतो चारा ; चरता येते 😀
ही अशी आहे दुनिया जेथे
बिघडता येते ; घडता येते !
सोय आहे ही भारी न्यारी
मी नवा आहे म्हणता येते 😀
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
21.10.2022 रात्री भर बारा वाजता
मागच्या मागे पळता येते
कोण काहीही बोलू शकतो
तोंड कोणाचे धरता येते ?
ठेविली कुरणे त्यांनी मोठी
भेटतो चारा ; चरता येते 😀
ही अशी आहे दुनिया जेथे
बिघडता येते ; घडता येते !
सोय आहे ही भारी न्यारी
मी नवा आहे म्हणता येते 😀
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
21.10.2022 रात्री भर बारा वाजता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा