शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

मन कितीही जरी झुरे आपले

मन कितीही जरी झुरे आपले 


मन कितीही जरी झुरे आपले 
कोण आहे म्हणा खरे आपले !


हाय, केलीस तू जखम लाघवी 
दाखवू मी कसे चरे आपले 


ओल गेली कुठे तुझी काळजा
आटले हे कसे झरे आपले 


काय झाले म्हणा गुदस्ता तरी ?
वर्ष हेही असे सरे आपले


शब्द येऊ नये जरा वावगा 
ओठ ओठावरी बरे आपले 

सर्व श्रोते उठून गेले पहा :
श्रेष्ठ, भाषण करा पुरे आपले 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपापल्यापरीने

आपापल्यापरीने  आपापल्यापरीने सारेच थोर होते ... आले कुठून मग हे डाकू नि चोर होते ? ज्यांची घरे गुलाबी ते झोपले कधीचे... ज्यांना न घर तयांचे ...