आसवे न ढाळतो
मी हसून राहतो अंतरात माझिया
मी तुलाच पाहतो
संपले ऋतू जरी
मी तरी न संपतो
मी तुझ्या मनातली
चांदरात मागतो
मी तुझाच, हे तुझा
चेहराच सांगतो !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
#मराठीगझल
#देवीदास_पाटील
मराठी गझलने मला जगवले. जिवंत ठेवले. कवी श्रेष्ठ सुरेश भटांनी खांद्यावर प्रत्यक्ष ठेवलेला हात आजही जाणवतो. त्यांचा विश्वास अधिक सार्थ ठरवायला जमले नाही, ही अंतरीची बोच आहेच. पण मराठी गझलमुळे आलेले #अंतरीचे_बोलही आहेत ! तेच इथे सापडतील ! #मराठीगझल #मराठी_गझल #अंतरीचेबोल
आपापल्यापरीने आपापल्यापरीने सारेच थोर होते ... आले कुठून मग हे डाकू नि चोर होते ? ज्यांची घरे गुलाबी ते झोपले कधीचे... ज्यांना न घर तयांचे ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा