अहवाल
मी न करणार कुठला अहवाल आता
काय तुमचा भरवसा ? बदलाल आता
काय काका बोलले पुतण्यास होते ?
कोणती नक्की कुणाची चाल आता !
लाजलज्जा कोळुनी प्याला अशी की
कोणतीही पातळी गाठाल आता !
घेतली ती शपथही खोटीच होती ... !
का दिल्या वचनांस त्या जागाल आता !
जीभ लाजेना जराही बोलतांना
बोललो नाहीच हे बोलाल आता
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
गुरू पौर्णिमा , ०३.०७.२०२३
रात्रौ ठीक १०.१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा