आपापल्यापरीने
आपापल्यापरीने सारेच थोर होते ...
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२०.०४.२०२४
आले कुठून मग हे डाकू नि चोर होते ?
ज्यांची घरे गुलाबी ते झोपले कधीचे...
ज्यांना न घर तयांचे जागेच घोर होते !
हसले पुन्हा नव्याने हुकमी लबाड बोके
त्यांनी पुन्हा दिले ते नारे मुजोर होते!
माणूसकी निघाली मोडीत आज होती
काळीज माणसांचे झाले कठोर होते !
ही लाट यौवनाची बघ ओसरून जाते...
जो पूर्ण चंद्र दिसतो त्याचीच कोर होते !
ज्यांची घरे गुलाबी ते झोपले कधीचे...
ज्यांना न घर तयांचे जागेच घोर होते !
हसले पुन्हा नव्याने हुकमी लबाड बोके
त्यांनी पुन्हा दिले ते नारे मुजोर होते!
माणूसकी निघाली मोडीत आज होती
काळीज माणसांचे झाले कठोर होते !
ही लाट यौवनाची बघ ओसरून जाते...
जो पूर्ण चंद्र दिसतो त्याचीच कोर होते !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२०.०४.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा