- झोपलेले बरे यार हो !
- बंद झाली घरे यार हो !
- माणसांनी किती सभ्य हे
- राखले चेहरे यार हो !
- छान दिसला जरी सापळा
- जीवघेणा ठरे यार हो !
- मी कुणाला कसे दाखवू ?
- काळजाला चरे यार हो !
- दिवस आले वसंतातले !
- मी पुन्हा मोहरे यार हो !
- लग्न ठरले कुणाशी तरी
- अन् कुणाला वरे यार हो !
- हया मनाचे न काही खरे !
- जे नको ते स्मरे यार हो !
- योजना बुडविण्याचीच ही
- योजना का तरे यार हो !
- ते झपाटून गेले पुरे !
- भक्त होते खरे यार हो !
- मी जगाचा सखा श्रीहरी
- राखतो मी गुरे यार हो !
- राम ओठावरी घोळतो
- बगल लपवी सुरे यार हो !
- काय बोलू तरी आणखी ?
- या , म्हणा की , पुरे यार हो !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा