" अंतरीचे बोल माझ्या " हा माझा ब्लॉग मराठी गझलला वाहिलेला आहे. मराठी गझलने मला जिवंत ठेवले आहे. तिने मला खूप काही दिले आहे. मराठी गझल ही मला खुद्द गुरुवर्य सुरेश भट यांनी थेट दिली आहे. त्यांचे थेट मार्गदर्शन मला सुरूवातीलाच काही वर्षे मिळाले हे माझे भाग्य आहे !
" अंतरीचे बोल माझ्या "या ब्लॉगमध्ये मराठी गझलबाबतचे माझे व इतरांचेही लेख असतील. तसेच, माझ्या मराठी गझलांसह मला आवडलेल्या सुंदर सुंदर मराठी गझलांचाही अंतर्भाव असेल.
मला खात्री आहे की माझा " अंतरीचे बोल माझ्या " हा ब्लॉग तुम्हांला निश्चितच आवडेल !
ज्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मला सुरूवातीलाच काही वर्षे मिळाले त्या आदरणीय गुरुवर्य #सुरेश_भट यांना समर्पित !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा