आपल्यासाठी कुठे गालीचे होते ?
त्याचसाठी तर म्हणे बाकीचे होते !
तू सुखा येऊ नको माझ्या वाटेला
दु:खं हे माझे उभ्या जन्मीचे होते !
कोण मी होतो मला माहीतच नव्हते
कोणते नाते मला खात्रीचे होते ?
कोणत्या होत्या दिशा माझ्या सोयीच्या ?
कोणते वारे मला सोयीचे होते ?
विसरलो मीही कसा हक्काच्या ओळी ?
विसरलो मी वाक्य जे टाळीचे होते !
रात्र अंधारी तरी सूर्याशी बोलू
वाटले केव्हा तरी रात्रीचे होते !
भेट होण्याची जराही खात्री नाही
गूढ हे माझ्या तुझ्या भेटीचे होते !
वाटते भीती अता साऱ्या नात्यांची
काय आजोबा तरी नातीचे होते ?
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२९.०८.२०२४ रात्रौ २३.४९
त्याचसाठी तर म्हणे बाकीचे होते !
तू सुखा येऊ नको माझ्या वाटेला
दु:खं हे माझे उभ्या जन्मीचे होते !
कोण मी होतो मला माहीतच नव्हते
कोणते नाते मला खात्रीचे होते ?
कोणत्या होत्या दिशा माझ्या सोयीच्या ?
कोणते वारे मला सोयीचे होते ?
विसरलो मीही कसा हक्काच्या ओळी ?
विसरलो मी वाक्य जे टाळीचे होते !
रात्र अंधारी तरी सूर्याशी बोलू
वाटले केव्हा तरी रात्रीचे होते !
भेट होण्याची जराही खात्री नाही
गूढ हे माझ्या तुझ्या भेटीचे होते !
वाटते भीती अता साऱ्या नात्यांची
काय आजोबा तरी नातीचे होते ?
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२९.०८.२०२४ रात्रौ २३.४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा