सोमवार, २ डिसेंबर, २०२४

झोपलेले बरे यार हो !

  • झोपलेले बरे यार हो !
  • बंद झाली घरे यार हो !

  • माणसांनी किती सभ्य हे
  • राखले चेहरे यार हो !

  • छान दिसला जरी सापळा
  • जीवघेणा ठरे यार हो !

  • मी कुणाला कसे दाखवू ?
  • काळजाला चरे यार हो !

  • दिवस आले वसंतातले !
  • मी पुन्हा मोहरे यार हो !

  • लग्न ठरले कुणाशी तरी
  • अन् कुणाला वरे यार हो !

  • हया मनाचे न काही खरे !
  • जे नको ते स्मरे यार हो !

  • योजना बुडविण्याचीच ही
  • योजना का तरे यार हो !

  • ते झपाटून गेले पुरे !
  • भक्त होते खरे यार हो !

  • मी जगाचा सखा श्रीहरी 
  • राखतो मी गुरे यार हो !

  • राम ओठावरी घोळतो
  • बगल लपवी सुरे यार हो !

  • काय बोलू तरी आणखी ?
  • या , म्हणा की , पुरे यार हो !


...  श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

आपापल्यापरीने

आपापल्यापरीने  आपापल्यापरीने सारेच थोर होते ... आले कुठून मग हे डाकू नि चोर होते ? ज्यांची घरे गुलाबी ते झोपले कधीचे... ज्यांना न घर तयांचे ...